आंतरराष्ट्रीय स्पेसस्टेशनवर झळकला तिरंगा

भारताच्या स्वातंत्रमहोत्सवाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात देश विदेशांबरोबर अंतराळातील स्पेस स्टेशनवर सुद्धा भारताचा तिरंगा फडकला आहे. नासाचे भारतवंशी अंतराळवीर राजाचारी यांनी या संदर्भातील काही फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत. याचबरोबर राजाचारी यांनी भारतवासियांना एक संदेशही दिला आहे. ते म्हणतात,’ आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील तिरंगा, शुभकामना’ चारी यांनी पोस्ट केलेल्या स्पेस स्टेशनच्या एका खिडकीवर लावलेल्या भारताच्या राष्ट्रध्वजाच्या फोटो मागे पृथ्वी दिसते आहे.

याच बरोबर चारी यांनी अंतराळातून घेतलेल्या हैद्राबादचा एक फोटो शेअर केला असून येथे माझ्या वडिलांचे घर आहे असे म्हटले आहे. नासा सह जगभरातील विविध क्षेत्रात भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला आहे. अंतराळ स्थानकात सहा महिन्याचा मुक्काम पूर्ण करून राजा नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत.

युएस मधल्या भारतीय दुतावासाने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात चारी, भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाच्या सोहळ्यात व्हर्च्युअली सेलेब्रेशन साठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.