टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आहे इतक्या संपत्तीचा मालक

टीम इंडिया मधील क्रिकेटपटूंच्या खेळाची चर्चा जशी नेहमी रंगते तसेच त्यांची लग्झरी लाईफस्टाईल सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असते. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजाचे गेल्या तीन चार वर्षात टीम मधील सदस्य म्हणून चांगलेच महत्व वाढले आहे. त्याची ब्रांड व्हॅल्यु सुद्धा वाढली आहे. रवींद्र जडेजा सुद्धा रॉयल लाईफस्टाईल साठी प्रसिद्ध आहे.

या ३३ वर्षीय खेळाडूचा जन्म ३ डिसेंबर १९८८ मध्ये जामनगर येथे झाला. त्याचे वडील सुरक्षा रक्षक होते आणि आई नर्स. त्याचे बालपण कठीण परिस्थितीतच गेले पण आजघडीला या खेळाडूची संपत्ती १३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अर्थात त्याची मुख्य कमाई क्रिकेट मधूनच झालेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आयपीएल मधून त्याने सर्वाधिक कमाई केली असून २०२२ मध्ये चेन्नई सुपरकिंग्सने त्याला १६ कोटी रूपयात रीटेन केले होते.

गुजराथच्या जामनगर मधील त्याचा बंगला म्हणजे एक महाल आहे. या चार मजली अलिशान घराचे अनेक फोटो त्याने वेळोवेळी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. जुने किमती फर्निचर, झुंबरे यांनी हा बंगला सजवला आहे. शिवाय त्याचे एक फार्म हाउस असून त्याचे नाव’ मि.जद्डू फार्म हाउस’ असे आहे. या शिवाय त्याच्या ताफ्यात अनेक कार्स आहेत. जाडेजाच्या आईची त्याने क्रिकेटर व्हावे अशीच इच्छा होती. पण टीम इंडियाच्या जर्सीत आई त्याला पाहू शकली नाही. त्यांचे २००५ मध्ये अपघाती निधन झाले होते.

आईच्या मृत्युनंतर जडेजाने क्रिकेट सोडून दिले होते. पण बहिण नयना हिने परिवाराची जबाबदारी घेऊन जडेजाला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. जडेजाने त्याच्या करीयर मध्ये १७१ वन डे मध्ये २४४७ धावा आणि १८९ विकेट, ६० कसोटी मध्ये २५२३ धावा आणि २४२ विकेट तर टी २०च्या ६२ सामन्यात ४२२ धावा आणि ५० विकेट घेतल्या आहेत.