बीड जिल्ह्यात लग्नाआधीच शोककळा, कार-टेम्पोच्या धडकेत सहाजणांचा मृत्यु


बीड : राज्यातील बीड जिल्ह्यात रविवारी सकाळी कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनेची माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार केज तालुक्यातील जिवाचीवाडी गावातील एक कुटुंब कारने पुण्याला जात असताना त्यांची कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. कुटुंबातील पाच सदस्य आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, टक्कर इतकी भीषण होती की पोलिसांना दोन्ही वाहनांना वेगळे करण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. मृताची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.