VLC Media Player Ban: BGMI नंतर सरकारने घातली आणखी एका चायनीज अॅपवर बंदी, जाणून घ्या काय आहे कारण


मीडिया प्लेअर सॉफ्टवेअर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हर VLC मीडिया प्लेअरवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार, व्हीएलसी मीडिया प्लेअर आणि व्हिडिओलॅन प्रकल्पाच्या वेबसाइटवर आयटी कायदा, 2000 अंतर्गत सरकारने बंदी घातली आहे.

व्हीएलसी मीडिया प्लेअर आणि त्याच्या वेबसाइटची सेवा सुमारे दोन महिने आधीच बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनी आणि सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. व्हीएलसी मीडियाची वेबसाईट ओपन केल्यावर आय अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.

काही अहवालांनुसार, VLC मीडिया प्लेअरवर देशात बंदी घालण्यात आली आहे, कारण त्याचा वापर चीन-समर्थित हॅकिंग ग्रुप Cicada द्वारे सायबर हल्ल्यांसाठी केला गेला होता. काही महिन्यांपूर्वी, सायबर तज्ञांनी सांगितले होते की सिकाडा दीर्घकाळ सायबर हल्ल्यासाठी व्हीएलसी मीडिया प्लेअर वापरत आहे. या हॅकिंग ग्रुपने या मीडिया प्लेअरमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले होते.

काही दिवसांपूर्वी घालण्यात आली होती बीजीएमआयवर बंदी
याआधीही सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात जवळपास 350 चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. अलीकडे, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) देखील Google Play Store आणि Apple च्या अॅपवरून अचानक गायब झाले. यानंतर, BGMI स्टोअरमधून गायब झाल्यामुळे गेम खेळाडू नाराज झाले आणि BGMI हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. BGMI बंदीची नंतर एका वृत्तसंस्थेने पुष्टी केली. 2020 मध्ये PUBG वर बंदी घातल्यानंतर BGMI ला PUBG चा नवीन अवतार म्हणून लॉन्च करण्यात आला होता.

ट्विट वरून मिळाली माहिती
या बंदीवर कंपनी आणि सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एका ट्विटर युजरने ट्विट करून ही माहिती दिली आणि सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर दोन महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली आहे, युजरने लिहिले की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे प्लॅटफॉर्म आयटी कायदा, 2000 अंतर्गत भारतात बंद करण्यात आले आहे.