IND vs ZIM ODI Series : टीम इंडिया झिम्बाब्वेला रवाना


नवी दिल्ली – भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात एकदिवसीय मालिका होणार आहे. यासाठी टीम इंडिया रवाना झाली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिका 18 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तीनही सामने हरारे येथे होणार आहेत. यासाठी भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारत ही मालिका खेळणार आहे.


या मालिकेसाठी टीम इंडियाने अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी आणि अष्टपैलू दीपक हुडा यांना स्थान मिळाले आहे. वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश आहे. पण तरीही त्याच्या खेळाबद्दल शंका आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून या दौऱ्यावर गेला आहे. लक्ष्मण टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू होता. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले.

शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे देखील भारतीय संघात आहेत. टीम इंडिया या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला खेळणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना 20 आणि 22 ऑगस्टला होणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दौऱ्यानंतर भारत आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे.