चंदीगड – पंजाबमधून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात ‘एक आमदार-एक पेन्शन’ कायदा मंजूर झाला आहे. आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारच्या या कायद्याला राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पंजाब सरकारने एक अधिसूचनाही जारी केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
मोठी बातमी: पंजाबमध्ये ‘एक आमदार-एक पेन्शन’ कायदा लागू, मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले- आता वाचणार जनतेचा पैसा
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले की, आता वाचणार आहे जनतेचा पैसा
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला पंजाबी लोकांना कळवताना अतिशय आनंद होत आहे की राज्यपालांनी “एक आमदार-एक पेन्शन” विधेयक मंजूर केले आहे. ‘वन पेन्शन’ कायद्याला मंजुरी मिळाल्याने आता जनतेचा कराचा मोठा पैसा वाचणार आहे. ते म्हणाले की, आता या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आमदारांना मिळणारी वेगळी पेन्शन संपुष्टात आली आहे.
आता आमदारांना मिळणार एकदाच पेन्शन
या विधेयकानुसार आतापासून एका आमदाराला एकच पेन्शन मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत एखादी व्यक्ती जितक्या वेळा आमदार झाली, तितक्या वेळा वेगवेगळी पेन्शन एकत्र जोडली गेली. एका आमदाराला एका टर्मसाठी 75,000 रुपये पेन्शन मिळते. यानंतर, प्रत्येक टर्मसाठी स्वतंत्र 66 टक्के पेन्शन रक्कम उपलब्ध आहे. सध्या 250 हून अधिक माजी आमदारांना पेन्शन मिळत आहे.
राज्य सरकारची होणार 80 कोटींची बचत
एका वृत्तानुसार, मे महिन्यात एका आमदाराने पेन्शनबाबत निवेदन दिले होते. त्या निवेदनात आमदारांनी सांगितले होते की, आमदारांना दरमहा सुमारे 75 हजार रुपये पेन्शन दिली जाते. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर राज्य सरकारची 80 कोटी रुपयांपर्यंत मोठी बचत होईल, असा विश्वास मान सरकारला होता. त्याचबरोबर सध्या सुमारे 325 आमदारांना पेन्शन दिली जात असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. असे अनेक आमदार आहेत ज्यांना दरमहा साडेपाच लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळत होती.