रेडमी के ५० अल्ट्रा स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी रेडमी ने तिचा फ्लॅगशिप फोन के ५० अल्ट्रा बाजारात आणला आहे. सध्या हा फोन फक्त चीन मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन चार स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध केला गेला असून त्याला वॉटर रेझिस्टंटसाठीचे आयपी-५३ रेटिंग मिळाले आहे. फोनला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

या फोनसाठी ६.७ इंची ओलेड डिस्प्ले असून स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिपसेट आहे. ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत अनुक्रमे ३५४०० आणि ३९ हजार रुपये आहे. १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजसाठी सुद्धा ३९ हजार रुपये मोजावे लागतील तर १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज फोनची किंमत ४७२०० रुपये आहे. फोनला अँड्राईड १२ वर आधारित एमआययुआय १३ ओएस आहे. फोनला व्हिसी लिक्विड कुलिंग सपोर्ट दिला गेला आहे.

या स्मार्टफोन साठी ट्रिपल कॅमेरा सेटअप रिअरला असून प्रायमरी कॅमेरा १०८ एमपीचा आहे. ८ एमपीचे अल्ट्रावाईड लेन्स आणि २ एमपीचे मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी २० एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन साठी ५ हजार एमएएचची बॅटरी असून ती १२० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ड्युअल सिम दिले गेले आहे. ब्लॅक, ब्ल्यू, सिल्व्हर कलर ऑप्शन मध्ये फोन मिळणार आहे.