सारा अली खान झाली २७ वर्षांची, इतकी आहे कमाई

बॉलीवूड मध्ये अल्पावधीत प्रसिद्धी मिळविलेली सैफ कन्या सारा आज म्हणजे १२ ऑगस्टला २७ वर्षांची झाली. १२ ऑगस्ट १९९५ ही साराची जन्मतारीख. अगदी कमी काळात बॉलीवूड मध्ये तिने करियरचा चांगला टप्पा गाठला आहे. तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफवरून ती नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या सोबत केदारनाथ चित्रपटातून साराने बॉलीवूड डेब्यू केला होता.

साराचा चित्रपट सृष्टीतील प्रवेश स्टार कीड म्हणूनच झाला असला तरी बिनधास्त वर्तन आणि सुपरहॉट अवतार यामुळे तिने चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. तिची मालमत्ता २२ कोटींची असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी तिची कमाई सरासरी ६ कोटी रुपये आहे. शिवाय सारा जाहिराती आणि काही कंपन्याची ब्रांड अँबेसीडर असून एका ब्रांड साठी ती ५० ते ६० लाख रुपये घेते असेही समजते.

चित्रपट सृष्टीत आल्यावर तिचे नाव सर्वप्रथम सुशांतसिंग बरोबर जोडले गेले होते. पण त्यानंतर कार्तिक आर्यन, ईशान खट्टर, हर्षवर्धन कपूर, वीर पहाडिया यांच्या सोबत तिचे नाव जोडले गेले. सोशल मिडीयावर सारा अॅक्टीव्ह आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे चार कोटी फोलोअर आहेत. तिने इन्स्टावर आत्तापर्यंत ८४१ पोस्ट केल्या आहेत.