आला शाओमीचा ‘मिक्स फोल्ड टू’ फोल्डेबल स्मार्टफोन
सॅमसंग फोल्ड फोर पाठोपाठ त्याला टक्कर देण्यासाठी चीनी कंपनी शाओमीने त्यांचा नवा स्मार्टफोन मिक्स फोल्ड टू चीन मध्ये लाँच केला आहे. या फोनचे प्रीबुकिंग सुरु झाले असून त्याची विक्री १६ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. गतवर्षी लाँच केलेल्या मिक्स फोल्डचा हा सक्सेसर आहे. त्याची किंमत ८९९९ युआन म्हणजे भारतीय रुपयात १.०६,३०० रुपये आहे. या फोनसाठी जबरदस्त फीचर्स दिली गेली आहेत.
या फोनचा स्क्रीन अनफोल्ड केल्यावर ८.२ इंची होतो. या फोनला ६.५ इंची फुल एचडी अमोलेड आऊटर डिस्प्ले कॉर्निंग गोरील्ला ग्लाससह दिला गेला आहे. दोन्ही डिस्प्ले डॉल्बी व्हिजनसह १००० निप्सपिक ब्राईटनेस देतात. फोनसाठी स्नॅपड्रॅगन ८ प्लस चिपसेट आणि लाईका ब्रांडचे तीन सेन्सर आहेत. त्यातील प्रायमरी कॅमेरा सेन्सर ५० एमपीचा आहे तर १३ एमपीचा अल्ट्रा वाईड, ८ एमपीचे टेलीफोटो लेन्स आहे. हा फोन ८ के व्हिडीओ रेकोर्डिंग सपोर्ट करतो.
या फोनला अंडरडिस्प्ले फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. १२ जीबी रॅम, १ टीबी इंटरनल स्टोरेज, अँड्राईड १२ ओएस, ४५०० एमएएचची ६७ वॉट फास्ट चार्जिंग बॅटरी आहे. फोनचे वजन २६२ ग्राम आहे.