शौर्यचक्र विजेत्या औरंगजेबच्या मातेने पूंच मध्ये फडकवला तिरंगा

जम्मू काश्मीरच्या पूंछ सीमाभागात शौर्यचक्र विजेता भारतीय लष्कराचा जवान औरंगजेब यांच्या आईने स्वतःच्या घरावर तिरंगा लावला आहे. ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब ईद साठी सुट्टीवर घरी येत असताना त्याचे अपहरण करून दहशतवाद्यांनी त्याची १४ जून २०१८ रोजी हत्या केली होती. या बहादूर जवानाची माता राजबेगम हिने बीजेपीचे जम्मू काश्मीर प्रमुख रवींद्र रैना यांच्या सोबत या अभियानात भाग घेतला.

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील होण्याचे आवाहन केले असून घरघरात राष्ट्रध्वज लावण्याचे अपील केले आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूंछ भागात तिरंगा फडकवताना बहादूर औरंगजेबच्या आई राजबेगम यांनी त्यांना ‘मुलाच्या हौतात्म्याचा अभिमान वाटतो, तो देशासाठी कामी आला’ अश्या शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हर घर तिरंगा अभियानात सामील होण्यासाठी इच्छुक भारतीय नागरिक नाव नोंदणी करू शकणार आहेत. त्याबद्दल सरकारकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे असे जाहीर केले गेले आहे.