सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड चार लाँच

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड फोर भारतासह ग्लोबल पातळीवर लाँच झाला असून हा फोल्डेबल फोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेडचे हे चौथे व्हर्जन असून त्याला शानदार कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. अंडरडिस्प्ले कॅमेराही असून ७.६ इंची डायनामिक अमोलेड २ एक्स इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे. कव्हर डिस्प्ले ६.२ इंची एचडीचा असून आर्मर अॅल्युमिनियम फ्रेम व हिंज कव्हर दिले गेले आहे.

कव्हर स्क्रीन व बॅक पॅनलला कॉर्निंग गोरील्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन सह आहे. फोन साठी स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ एसओसी, १२ जीबी रॅम, २५६ तसेच ५१२ व १ टीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनची सुरवातीची किंमत अन्य देशात १,४२,७०० रूपये असून भारतात १,४६,०४६ रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड फोर साठी पाच कॅमेरे दिले गेले आहेत.कव्हर डिस्प्लेच्या आत एक कॅमेरा व तीन रिअर कॅमेरे आहेत. ५० एमपीचा प्रायमरी ड्युअल पिक्सल ऑटोफोकस कॅमेरा असून १२ एमपी अल्ट्रा वाईड सेन्सर, १० एमपी सेन्सर आणि फ्रंट ला ४ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. अँड्राईड १२ एल वर आधारित वन युआय ४.१.१ असलेला हा पहिलाच फोन आहे.

हा फोन फाईव्ह जी, फोर जीला सपोर्ट करतो तसेच त्याला युएसबी पोर्ट दिले गेले आहे. फोन साठी ४४०० एमएएचची दुहेरी बॅटरी दिली गेली आहे.