Corbevax booster shot : कॉर्बेव्हॅक्स बूस्टर डोस म्हणून मंजूर, यांना दिला जाईल डोस


नवी दिल्ली – कोविडच्या प्रतिबंधासाठी बायोलॉजिकल ई कंपनीने तयार केलेल्या कॉर्बेव्हॅक्स बूस्टर लसीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी हे डोस दिले जातील.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्यांना पूर्वी कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशील्ड लसी आहेत, त्यांना कॉर्बेवॅक्सचा डोस बूस्टर पर्याय म्हणून दिला जाऊ शकतो.