मंकीपॉक्स करोना प्रमाणेच होतोय बहुरूपी

जगावरून करोनाचे संकट पूर्ण गेले नसतानाचा मंकीपॉक्सच्या फैलावामुळे नवी चिंता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे करोना प्रमाणेच मंकीपॉक्स  त्याचे रूप बदलत चालला असून रोज नवी लक्षणे समोर येत आहेत. जगाच्या ८० देशात मंकीपॉक्सचा फैलाव झाला असून १७ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यामुळे ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित केली आहे. या रोगावर अजून रामबाण उपचार नाही. त्याच बरोबर मंकीपॉक्सचा प्रसार नक्की कसा होतो याचे उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात डॉक्टर्स आणि वैज्ञानिक असून त्याचे स्पष्ट उत्तर अजून मिळालेले नाही.

वैज्ञानिकांच्या एका गटाने मंकीपॉक्सचा प्रसार लैंगिक संबंधातून होत असल्याचे निदान केले आहे तर अन्य एका टीमने या रोगाची अन्य दोन लक्षणे शोधली आहेत. युके मधील १९७ संक्रमितांच्या डेटाचे अध्ययन केले असता मंकीपॉक्स रूप बदलत असल्याचे दिसून आले आहे. नवीन लक्षणांमध्ये गुदद्वारात वेदना, घसा खराब असणे, टॉन्सील सुजणे, एडीमा, तोंड येणे अशी लक्षणे दिसली आहेत. मुख्यत समलिंगी संबंध आणि बायसेक्शुअल पुरुषांच्या माध्यमातून याचा फैलाव अधिक होतो असे म्हटले जाते.

युएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन तर्फे मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या निकट गेल्यास, त्याचे कपडे अथवा अन्य वस्तू वापरल्यास, मिठी मारणे, चुंबन घेणे यातून मंकीपॉक्स पसरू शकतो. या रोगाची मुख्य लक्षणे ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, पाठ दुखी, लसिका ग्रंथी सूज, अंगावर फोड, थकवा अशी आहेत. त्यात रोज नवीन लक्षणांची भर पडते आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही