आली ह्युंदाईची रडारवाली एसयुव्ही

आज म्हणजे १० ऑगस्टला भारतात ह्युंदाईची नवी एसयुव्ही २०२२ ट्यूसॉन फेसलिफ्ट लाँच केली जात असून हा कार्यक्रम दुपारी १२ वा. होत आहे. गेल्या महिन्यात ही कार सादर केली गेली होती आणि ५० हजार रुपये भरून त्याचे बुकिंग करता येणार आहे. या प्रीमियम एसयुव्हीला खास फीचर्स दिली गेली आहेत. ही एसयूव्ही टू एडीएएस असून या प्रकारची भारतातली पहिली एसयूव्ही आहे. ऑटोनेटेड सेन्सिग टेक्नोलॉजी, कोणतेही ऑब्जेक्ट डिटेक्ट करणारा कॅमेरा व रडार सेन्सर दिला गेला असून अवघड क्षणी ही कार स्वतःच ब्रेक लावू शकते.

या एसयूव्हीला एलईडी हेडलाईट, मोठे ग्रील, एलईडी टेललाईट, शार्क फिन अँटेना, पॅनारॉमिक सनरुफ दिले गेले आहे. इंटिरियरमध्ये १०.१ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०.१ इंची ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, ३६० डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटीलेटेड सीटस, कीलेस एन्ट्री, ऑटो डीमिंग ओआरव्हीएम फिचर आहे. शिवाय २९ फर्स्ट इन सेग्मेंट फीचर्स आहेत. या एसयूव्हीची बेसिक किंमत २५ लाख रुपये आहे. डीझेल मॉडेलची किमंत ३० लाख आहे.

ही एसयूव्ही २.० लिटर पेट्रोल आणि २.० लिटर डीझेल अश्या दोन ऑप्शन मध्ये आहे. पेट्रोल साठी सहा स्पीड ऑटोगिअर बॉक्स आहे तर डीझेल साठी ८ स्पीड ऑटोगिअरबॉक्स आहे.