6 वेळा आमदार, सर्वात श्रीमंत नेता, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंगलप्रभात लोढा यांची का होत आहे चर्चा ?


मुंबई : महाराष्ट्रात मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच आमदारांचे फोन वाजू लागले. पहिल्या टप्प्यात 15 ते 17 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, बबनराव लोणीकर, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, नितेश राणे अशी नऊ नावे पुढे येत आहेत. त्यात मंगलप्रभात लोढा यांचे नाव आघाडीवर आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे फोन आले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या 4 मोठ्या नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही चर्चा आहे. मंगलप्रभात लोढा हे रिअल इस्टेटमधील मोठे नाव आहे. ते मुंबई भाजपचे अध्यक्षही आहेत. देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. फोर्ब्सच्या यादीतही त्यांचे नाव आहे.

कोण आहेत मंगलप्रभात लोढा?
मंगल प्रभात लोढा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 70 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार लोढा यांच्याकडे 441 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मंगलप्रभात लोढा, 66, मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी असलेले मंगलप्रभात मारवाडी समाजाचा मुख्य चेहरा मानला जातात. 1995 पासून ते सलग 6 वेळा आमदार राहिले असले, तरी त्यांना कधीही मंत्रीपद मिळालेले नाही.