अरुणाचल प्रदेशातील म्यानमार सीमेजवळ आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला, एक SCO जवान जखमी


नवी दिल्ली: ULFA-I आणि NSCN-KYA च्या संशयित दहशतवाद्यांनी भारत-म्यानमार सीमेजवळ आज सकाळी अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केला. नागालँडमध्येही अशाच घटना घडल्या आहेत. संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका जेसीओ जवानाला किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय कोणत्याही जवानाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दुसरीकडे, आसाम रायफल्सचे जवान आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कडक नजर ठेवत गस्त वाढवत आहेत.