Special Train : मुंबईकरांसाठी कामाची बातमी! रेल्वे चालवणार एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन, प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट


मुंबई : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी कामाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी जयपूर ते मुंबई मार्गावर एसी सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानहून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट सहज मिळू शकणार आहे. गुजरात आणि राजस्थानमधील अनेक भाग या ट्रेनद्वारे कव्हर केले जातील. मुंबई सेंट्रल-जयपूर-बोरिवली एसी सुपरफास्ट स्पेशल असे या ट्रेनचे नाव आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष ट्रेन सुरू
जयपूर व्यतिरिक्त, या ट्रेनद्वारे वापी, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर यांसारख्या अनेक प्रमुख स्थानकांचा समावेश केला जाईल. यासोबतच या ट्रेनमध्ये काही स्लीपर कोचही बसवण्यात येणार आहेत. अनेक सणांमुळे मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे.

अशा परिस्थितीत प्रवाशांना गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वेने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन 10 ऑगस्ट रोजी जयपूर ते मुंबई दरम्यान धावणार आहे. जाणून घेऊया या ट्रेनचे वेळापत्रक-

जाणून घ्या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे मुंबई सेंट्रल-जयपूर-बोरिवली एसी सुपरफास्ट स्पेशलची ट्रेन क्रमांक 09183 आहे, जी 10 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच उद्या बुधवारी मुंबई सेंट्रल येथून रात्री 10.50 वाजता धावेल. ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6.30 वाजता जयपूर स्थानकात पोहोचेल. त्याच वेळी, ती 11 ऑगस्ट रोजी जयपूरहून मुंबईसाठी ट्रेन क्रमांक 09184 म्हणून सुटेल. जयपूरहून 7.35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.30 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. या प्रवासात बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर आणि दुर्गापुरा अशा अनेक स्थानकांवर ट्रेन थांबेल.