प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


मराठी इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी गिरगावातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून या अभिनेत्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळखले जात होते.

1 जानेवारी 1970 रोजी जन्मलेल्या प्रदीप पटवर्धन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. या भूमिकेने सर्वांच्या मनात घर केले होते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रदीप पटवर्धन यांना 2019 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.