आशिया कपच्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह स्पर्धेबाहेर


नवी दिल्ली : भारताने आशिया कप 2022 साठी संघ घोषित केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहलीही या संघाचा एक भाग आहे. मात्र आशिया चषकापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. संघाचे अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दोघेही स्पर्धेबाहेर झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे आशिया कपमध्ये खेळता येणार नाही.

वेगवान गोलंदाज बुमराह आणि हर्षल जखमी झाले आहेत. याच कारणामुळे त्यांना आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. संघाची घोषणा करण्यासोबतच बीसीसीआयने ट्विटरवर ही माहिती दिली. बोर्डाने लिहिले की, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीत. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.


विशेष म्हणजे आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर टीम इंडिया आपला पहिला सामना 28 ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आशिया कप 2022 साठी टीम इंडियाचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, आर जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.