मोदींना पाकिस्तानी बहिणीची राखी, २०२४ साठी शुभेच्छा

देशात रक्षाबंधन ११ ऑगस्ट रोजी साजरे होत आहे आणि त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यासाठी पाकिस्तान मधून कमर मोहसीन शेख यांनी राखी आणि सोबत एक पत्र पाठविले आहे. कमर गेली २६ वर्षे मोदींना राखी बांधत आहेत. एएनआयच्या बातमीनुसार कमरबानो यांनी यंदा मोदींची भेट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, ‘या वेळी मोदी दिल्लीला बोलावतील अशी आशा आहे. सर्व तयारी केली आहे. कमरबानो यांनी स्वतःच ही राखी तयार केली आहे. राखीसोबतच्या पत्रात त्यांनी आपल्या या भावाला निरामय दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे .

कमरबानो म्हणतात,’२०२४ च्या निवडणुकीसाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. ते पुन्हा पंतप्रधान बनणार यात काहीही शंका नाही. त्यांचा तो हक्क आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. गतवर्षी सुद्धा त्यांनी मोदींना राखी आणि पत्र पाठवले होते.

कमरबानो सांगतात,’१९८१ मध्ये त्या प्रथम त्यांच्या परिवारासह अहमदाबाद येथे आल्या. त्यांचा विवाह मोहसीन खान यांच्याशी झाला आणि त्या हिंदुस्थानी झाल्या. तत्कालीन गुजराथ राज्यपाल डॉ. स्वरूपसिंह यांनी त्यांना मुलगी मानले होते. १९९५ मध्ये पाकिस्तानला जाताना डॉ. स्वरूपसिंह कमरबानोना सोडण्यासाठी स्वतः विमानतळावर आले तेव्हा त्यांच्या सोबत मोदी होते. तेव्हा मोदी भाजपचे महामंत्री होते. स्वरूपसिंग यांनी मोदींना’ हिची काळजी घे, मी तिला मुलगी मानले आहे’ असे सांगितले तेव्हा मोदींनी तुमची मुलगी म्हणजे माझी बहिण झाली असे सांगितले आणि तेव्हापासून कमरबानो मोदींना राखी बांधतात. त्या सांगतात, मोदी नंतर गुजराथचे मुख्यमंत्री बनले पण तरीही कमरबानोना त्यांची भेट घेण्यासाठी कधी अपॉइंटमेंट घ्यावी लागलेली नाही.मोहसीन खान, नरेंद्र मोदी, राखी, पाकिस्तान,