बँकॉक – थायलंडमधील नाईट क्लबमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत 40 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत.
Fire in Nightclub : थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर
चोनुबारी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात नाईट क्लबला आग लागल्याची घटना घडली. हे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे. पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊंटन बी नाईट क्लबमध्ये काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. मृतांमध्ये सहभागी असलेले सर्वजण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथमस्थान फाऊंडेशनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, आगीत होरपळून 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हा नाईट क्लब रंगीबेरंगी रात्रींसाठी प्रसिद्ध होता. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकही येत असत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आगीच्या व्हिडिओमध्ये लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक ओरडताना दिसत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.