इस्रो कडून ७ ऑगस्टला अंतराळात झेपावणार तिरंगा
१५ ऑगस्ट २०१८ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्रदिननिमित्त अंतराळात तिरंगा फडकेल असे स्वप्न बोलून दाखविले जोते. यामागे मोदींना राष्ट्रीय ध्वजासह गगनयान मानवयुक्त मोहीम राबविली जात असल्याचे सूचित करायचे होते. मात्र काही अडचणी आल्यामुळे ही मोहीम थोडी लांबली आहे. पण देशाची अंतराळ संस्था इस्रोने अंतराळात तिरंगा पाठविण्याची इच्छा अन्य मोहिमेतून पूर्ण केली आहे.
येत्या ७ ऑगस्ट रोजी इस्रो एसएसएलव्हीच्या माध्यमातून ५०० किलो पेक्षा कमी वजनाच्या पेलोड सह एक उपग्रह प्रक्षेपित करणार असून यातून तिरंगा अंतराळात पाठविला जाणार आहे असे समजते. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ मिनिटांनी श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळकेंद्रातून एसएसएलव्ही मधून ‘आझादी सॅट’ नावाचा एक सहयात्री उपग्रह सुद्धा प्रक्षेपित केला जात असून त्यात ७५ ग्रामीण भागातील सरकारी शाळामधील ७५० विद्यार्थ्यांनी तयार केलेले ७५ पेलोड समाविष्ट आहेत. नवा उपग्रह गेमचेंजर ठरेल आणि भारताला नव्याने उदयास येत असलेल्या स्मॉल सॅटेलाईट बाजारात प्रवेश करण्याची संधी त्यामुळे खुली होईल असे म्हटले जात आहे.