ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर, खेळवले जाणार एकूण नऊ सामने


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया आपल्या घरच्या हंगामाची सुरुवात कांगारूंविरुद्धच्या टी-20 मालिकेने करणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या कालावधीत एकूण नऊ सामने होतील. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी दोन मोठ्या संघांना पाचारण केले आहे.

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 20 सप्टेंबरला मोहालीत, दुसरा T20 23 सप्टेंबरला नागपुरात आणि तिसरा T20 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळून T20 विश्वचषकाची तयारी पूर्ण करेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रममध्ये, दुसरा T20 गुवाहाटीमध्ये 2 ऑक्टोबरला आणि तिसरा T20 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.

वनडे मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौमध्ये, दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये आणि तिसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. ही एकदिवसीय मालिका 2020 मधील रद्द झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या बदल्यात म्हणून खेळली जाईल. वास्तविक, 2020 मध्ये कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर पोहोचला होता. आता ही मालिका या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20, 20 सप्टेंबर, मोहाली
दुसरा T20, 23 सप्टेंबर, नागपूर
तिसरी T20, 25 सप्टेंबर, हैदराबाद

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका
पहिला T20, 28 सप्टेंबर, त्रिवेंद्रम
दुसरी T20, 2 ऑक्टोबर, गुवाहाटी
तिसरा T20, 4 ऑक्टोबर, इंदूर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका
पहिली वनडे, 6 ऑक्टोबर, लखनौ
दुसरी वनडे, 9 ऑक्टोबर, रांची
तिसरी वनडे, 11 ऑक्टोबर, दिल्ली