मायावतींची मोठी घोषणा, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार जगदीप धनखर यांना पाठिंबा


लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी बुधवारी आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.

मायावतींनी ट्विट करताना लिहिले की, हे सर्वश्रुत आहे की, देशातील सर्वोच्च राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत सत्ता आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे यासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली. आता हीच परिस्थिती असल्याने उप राष्ट्रपतीपदाची निवडणूकही 6 ऑगस्टला होत आहे.

त्यांनी लिहिले की, BSP ने जगदीप धनखर यांना व्यापक जनहित आणि उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील त्यांच्या हालचाली लक्षात घेऊन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी आज औपचारिकपणे घोषणा करत आहे.