केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राइक: 348 मोबाइल अॅप्सवर घातली बंदी, त्यातील काही आहते चीनची


नवी दिल्ली – बीजीएमआय गेमनंतर आता केंद्रातील मोदी सरकारने 300 हून अधिक मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. एका अहवालानुसार, भारत सरकारने चीनसह जगातील विविध देशांमध्ये बनविलेले 348 मोबाइल अॅप्स ओळखले आणि ब्लॉक केले आहेत, ज्यांनी नागरिकांची प्रोफाइल करण्यासाठी वापरकर्त्याचे तपशील गोळा केले आहेत आणि ते अनधिकृतपणे परदेशात प्रसारित केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत भाजपच्या रोडमल नगरच्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.

देशाबाहेर नेला जात होता डेटा
चंद्रशेखर म्हणाले, हे 348 मोबाईल ऍप्लिकेशन्स वापरकर्त्यांची माहिती गोळा करत होते आणि अनधिकृत प्रोफाइलिंगसाठी देशाबाहेरील सर्व्हरवर प्रवेश करत होते. ते म्हणाले, MHA च्या विनंतीच्या आधारे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) त्या 348 मोबाईल ऍप्लिकेशन्सना ब्लॉक केले आहे कारण असे डेटा ट्रान्समिशन भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे, भारताच्या संरक्षणाचे आणि राज्याच्या सुरक्षेचे उल्लंघन करत होते.

चीनमध्ये बनवलेले काही अॅप्स
ही सर्व अॅप्स चीनने विकसित केली आहेत का, असे विचारले असता चंद्रशेखर म्हणाले, हे अॅप्स चीनसह विविध देशांनी विकसित केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले BGMI
दक्षिण कोरियन गेमिंग दिग्गज क्राफ्टनने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यानंतर काही दिवसांनी सरकारचा निर्णय आला आहे. गुगलने यासंदर्भात सरकारकडून आदेश प्राप्त करून अॅपवर प्रवेश अवरोधित केला असल्याचे सांगितले होते. दरम्यान सप्टेंबर 2020 मध्ये, डेटा सुरक्षेच्या कारणास्तव, Krafton’s PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) 117 इतर चीन-लिंक अॅप्ससह ब्लॉक करण्यात आले होते.

वर्षाच्या सुरुवातीला, सुरक्षेच्या कारणास्तव माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत 14 फेब्रुवारी रोजी बॅटल रॉयल गेम फ्री फायरसह 53 अन्य चीनशी संबंधित अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.