जवाहिरीचा वेध घेणारे, आर ९ एक्स हेलफायर मिसाईल म्हणून आहे खास

रविवारी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हणजे सीआयएने अल कायदाचा पुढारी अल जवाहिरी याला अतिशय खतरनाक अश्या चा वापर करून ठार केले. त्यासाठी वापरले गेलेले मिसाईल आर ९ एक्स हेलफायर हे त्या ड्रोन पेक्षा अधिक खतरनाक होते. जगातील हे सर्वात अत्याधुनिक शस्त्र म्हणून ओळखले जाते आणि एका क्षणात ते ज्याच्यावर डागले जाते त्यांची नामोनिशाणी ठेवत नाही अशी त्याची कीर्ती आहे.

या मिसाईलची खासियत म्हणजे त्यात दारूगोळा वापरला जात नाही तर सहा धारदार ब्लेड्स शत्रू कापून काढण्याचे काम करतात. लेसरने परिपूर्ण असलेले हे मिसाईल टार्गेटवर ड्रॉप झाले की, त्यातून वाचणे अशक्य मानले जाते. या मिसाईलला ‘निन्जा मिसाईल’ असेही म्हटले जाते. या मिसाईल ने त्याची नवी शिकार जवाहिरीच्या रूपाने केली आहे. अमेरिकन मिलिटरी मधील हे सर्वात सोफेस्टीकेटेड मिसाईल अचूक हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहेच पण या हल्ल्यात फक्त टार्गेट नष्ट होते. त्यामुळे आजूबाजूचे नुकसान होत नाही. बराक ओबामांच्या काळात म्हणजे २०११ मध्ये ते विकसित केले गेले.

सीआयए आणि अमेरिकेचा रक्षा विभाग यांनी मिळून विकसित केलेले हे मिसाईल लॉकहिड मार्टिन आणि नॉर्थ रोप गुम्मान यांनी मिळून तयार केले. २०१७ मध्ये हे मिसाईल प्रथम तैनात केले गेले तेव्हा त्यात अल कायदाचाच अबू अल खैर अल मसरी ठार झाला होता. या मिसाईलची ब्लेड इतकी धारदार आहेत कि बिल्डींग, कारचे छत, माणसाची खोपडी ते एका क्षणात चिरू शकते.

१ ऑगस्ट रोजी काबुल मधील घराच्या बाल्कनीवर दोन मिसाईल फायर केली गेली होती त्यात जवाहिरी ठार झाला. जून २०२२ मध्ये सिरीया मध्ये अबू हमजा याच मिसाईलने मारला गेला. २०१९ मध्ये प्रथम या मिसाईलची माहिती वॉक स्ट्रीट जर्नल मध्ये दिली गेली त्यात आर ९ एक्स हेलफायर अफगाणिस्थान, यमन, इराक, लिबिया, सोमालिया मध्ये वापरले गेल्याचे नमूद केले गेले होते.