सल्लू भय्याने खरेदी केली नवी बुलेटप्रुफ लँड क्रुझर
बॉलीवूड दबंग सलमान खान याचे चाहते करोडोंच्या संखेने आहेत आणि सल्लू भय्याला गेले काही दिवस जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने थोडे चिंतेत सुद्धा आहेत. पण चाहत्यांनी फार काळजी करू नये कारण सल्लू भय्याने स्वतःची सुरक्षा वाढविली आहे आणि नुकतीच एक नवी बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. सल्लू आणि त्याची टीम सोमवारी या नव्या बुलेटप्रुफ लँड क्रुझर मधून मुंबई विमानतळावर आल्याचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यात कार मधून उतरत असलेल्या सलमान शेजारी त्याचा बॉडीगार्ड शेरा दिसत आहे.
कार वेबसाईट ‘कार वाले’ नुसार ही नवी कार टोयोटोची लँड क्रुझर असून तिची किंमत दीड कोटी रुपये आहे. बुलेट प्रुफ रिलायबिलीटी सह ही कार येते. गेल्याच महिन्यात सल्लू भैय्याने मुंबईचे पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला आहे. गायक सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्त्या झाल्यावर काही दिवसानी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. काळवीट शिकार प्रकरणात सलमान कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई यांच्या रडारवर असून त्यानेच सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा संशय आहे.