आला वनप्लस चा १० टी फाईव्ह जी स्मार्टफोन
बजेट, मिडरेंज स्मार्टफोन आज बाजारात स्वतःचे खास स्थान मिळवून असले तरी फ्लॅगशिप फोनची क्रेझ बरकरार राहिलेली दिसते. हे फोन युजर्सना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा चांगला पर्फोर्मंस अनुभव देतात. वनप्लसच्या प्रीमियम स्मार्टफोननी असा अनुभव युजर्सना दिला आहे. त्यांचा नवा स्मार्टफोन वनप्लस १० टी फाईव्ह जी आज न्यूयॉर्क मध्ये सादर होत असून त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे.
जाणकारांच्या मते हा फोन यंदाचा ‘अल्टीमेट फ्लॅगशिप फोन ऑफ द ईअर’ शाबित होईल. त्याला स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन वन प्रोसेसर दिला असून त्यामुळे कमी पॉवरचा वापर केला जातो. हा प्रोसेसर एआय इंजिन सह असून चारपट फास्ट आहे. या फोन साठी १६ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज असून मल्टीटास्कींग त्यामुळे सहज सुलभ होते. गेमिंग मध्ये अधिक मजेचा अनुभव येतो. फोन शक्यतो हँग होत नाही.
या फोन साठी १५० डब्ल्यू सुपरवूक एडिशन चार्जिंग सपोर्ट दिला गेला असून ४८०० एमएएचची बॅटरी असेल. १० मिनिटात फोन एक दिवस वापराइतका चार्ज होईल आणि पूर्ण चार्ज होण्यास १९ मिनिटे लागतील. या फोन साठी ६.७ इंची अमोलेड डिस्प्ले आणि रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट दिला जाईल असे संकेत दिले गेले आहेत. प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असेल असे समजते. या फोनची किंमत ४० ते ५० हजार रुपयाच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे.