दोन बायका, सात मुले आणि पेशाने सर्जन, कोण होता काबूलमध्ये घुसून अमेरिकेने मारलेला जवाहिरी


काबूलमध्ये ड्रोन हल्ल्यात आपल्या लष्कराने दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमान अल-जवाहिरीला ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ओसामा बिन लादेननंतरची ही अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी कारवाई होती.

आयमान अल जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी एका संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला. जवाहिरी हा पेशाने सर्जन होता. वयाच्या 14 व्या वर्षी ते मुस्लिम ब्रदरहूडचे सदस्य झाले. जवाहिरीने ओसामा बिन लादेनसोबत 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा (9/11) कट रचला होता. जाणून घेऊया कोण होता हा जवाहिरी?

गिझामध्ये जन्मलेला, बिन लादेननंतर अल कायदाचा बनला नेता
आयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1951 रोजी इजिप्तमधील गिझा येथे झाला. जवाहरी याने इजिप्तमधील कैरो विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. तो सर्वोच्च सर्जन मानला जात होता. जवाहिरीच्या घरातील अनेक लोक डॉक्टर आणि रिसर्च स्कॉलर आहेत. अरबी आणि फ्रेंच भाषा बोलणाऱ्या जवाहिरीने 1978 मध्ये कैरो विद्यापीठातील तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी अजा नोवारीशी विवाह केला. 2001 मध्ये अजाचा मृत्यू झाला. यानंतर त्याने उमैमा हुसैनशी दुसरे लग्न केले. जवाहिरीला सात मुले आहेत. फातिमा, उमायामा, नबिला, खडिगा, मोहम्मद, आयशा आणि नववर.

स्थापन केला इस्लामिक जिहाद
जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहादची स्थापना केली. या संघटनेने 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध केला होता. इजिप्तमध्ये इस्लामिक सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्याने केली. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांच्या हत्येनंतर जवाहिरीला 1981 मध्ये अटक करण्यात आली होती. इजिप्तमध्ये तीन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर, तो सौदी अरेबियाला पळून गेला आणि वैद्यकीय विभागात प्रॅक्टिस करू लागला.

बिन लादेनची भेट आणि एकत्रितपणे संपूर्ण जगाला दिला धक्का
अल-जवाहिरीने अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियात भेट घेतली. दोघांची मते सारखीच होती. 2001 मध्ये अल-जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहादचे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. त्यानंतर अल कायदाच्या माध्यमातून जगभरात दहशत पसरवण्यास सुरुवात झाली.

लादेनच्या मृत्यूनंतर मिळाली अल कायदाची कमांड
अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. 2011 मध्ये तो अल कायदाचा नेता झाला. जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले. यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ टॉवर्सला धडकली. या हल्ल्यात 93 देशांतील 2,977 लोक मारले गेले. अल कायदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. ओसामा बिन लादेन आणि अल-जवाहरी यांनी त्याची योजना आखली होती.

अनेक देशांच्या दूतावासांसमोर झाले हल्ले
7 ऑगस्ट 1998 रोजी एकाच वेळी अनेक देशांच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 224 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 12 अमेरिकनांचा समावेश होता आणि 4,500 हून अधिक लोक जखमी झाले होते. यामागे जवाहरचा हात होता.

मे 2003 मध्ये, सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये एकाच वेळी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात नऊ अमेरिकन लोकांसह 23 लोक मारले गेले. काही दिवसांनी जवाहिरीचा आवाज असलेली एक टेप प्रसिद्ध झाली.

जवाहिरीचा ठावठिकाणा बराच काळ गूढ राहिला होता. 2020 च्या उत्तरार्धापासून अल-जवाहिरीचा या आजाराने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरत होत्या. यूएन अॅनालिटिकल सपोर्ट अँड सॅन्क्शन्स मॉनिटरिंग टीमच्या अलीकडील अहवालाने पुष्टी केली की जवाहिरी अफगाणिस्तानमध्ये राहत आहे आणि मुक्तपणे संवाद साधत आहे. 2021 मध्ये, अल कायदाने जवाहिरीच्या मृत्यूची बातमी खोटी ठरवणारा एक व्हिडिओ जारी केला.

ओसामासारखा मारला गेला
अल-जवाहिरी 71 वर्षांचा होता. अमेरिकेनेही त्याला ओसामा बिन लादेनसारखे घुसून मारले. अफगाणिस्तानातील काबूल येथे ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला.