नवी दिल्ली – राजधानीत मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे. आणखी एका नायजेरियन व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. याआधी सोमवारी दिल्लीतील 35 वर्षीय नायजेरियन व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळून आला होता. पण त्यांनी अलीकडे परदेश दौरा केलेला नाही.
Monkeypox in Delhi : दिल्लीत मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण, आणखी एका नायजेरियन व्यक्तीमध्ये संसर्गाची पुष्टी
दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा तिसरा रुग्ण असून आज (मंगळवारी) सापडला आहे. बाधित व्यक्तीला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. LNJP हॉस्पिटल हे मंकीपॉक्सच्या उपचारांसाठी नोडल हॉस्पिटल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या पाच दिवसांपासून ताप होता आणि त्यांच्या अंगावर फोड आले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी अहवाल आला, ज्यामध्ये त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
दिल्लीतील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 25 दिवसांत झाला बरा
राजधानी दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या मकीपॉक्स बाधित रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाचे एमडी डॉ सुरेश कुमार यांनी ही माहिती दिली. रुग्ण पूर्णपणे बरा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकनायक रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या मंकीपॉक्स बाधित रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णाची प्रकृती ठीक आहे, त्याच्या अंगावरील लाल पुरळही बरा झाला आहे. लोकनायक रुग्णालयाचे एमडी डॉ.सुरेश कुमार यांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.