मोठा निष्काळजीपणा : विमानाखाली कार पार्किंग, दिल्ली विमानतळाचा व्हिडिओ आला समोर


नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये इंडिगो विमानाच्या तोंडाखाली गो ग्राउंडमध्ये मारुतीची कार पार्क केलेली दिसत आहे. हे विमान दिल्लीहून पाटण्याला जाणार होते. या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ एका प्रवाशाने बनवला असून, तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्याचे समजते.

जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक
विमानतळावरील रहदारीच्या दृष्टीने हे अत्यंत व्यस्त विमानतळ असल्याने अशा व्हिडिओंमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्डने जारी केलेल्या जागतिक हवाई वाहतूक रँकिंगच्या यादीनुसार, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये त्याचा समावेश आहे. जगात ते 13 व्या क्रमांकावर आहे. यासोबतच देशांतर्गत उड्डाणांची संख्याही खूप जास्त आहे.