ओसामा-बिन-लादेनच्या मृत्यूनंतर अल-जवाहिरी अल-कायदाच्या सिंहासनावर बसला. आता त्याच्या मृत्यूनंतर या दहशतवादी फॅक्टरी अल कायदाचा पुढचा प्रमुख कोण असेल, याची चर्चा रंगली आहे. या दहशतवादी संघटनेकडे भ्याड दहशतवाद्यांची कमतरता नसली, तरी असा एक दहशतवादीही आहे, जो आता या संघटनेच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे.
Al Qaeda Next Chief : अल कायदाचा वारस जवाहिरीपेक्षा भयंकर क्रुकर्मी, स्वतःला समजतो न्यायाची तलवार
अल कायदाच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. अल-अदेल हा अल-कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि संघटनेतील त्याची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात बोलते. मिळालेल्या माहितीनुसार, अल-अदेल ओसामा-बिन-लादेन आणि अल-जवाहिरीचाही जवळचा मानला जातो. मात्र, त्याच्याबद्दल फार कमी माहिती जगासमोर आली आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचा हात असल्याचे मानले जात आहे.
स्वतःला म्हणवून घेतो न्यायाची तलवार
अल अदेल हे दहशतीच्या जगाचे जुने नाव आहे. तो इजिप्शियन सैन्याचा माजी अधिकारी होता. तो स्वत:ला ‘स्वार्ड ऑफ जस्टिस’ देखील म्हणतो. अल-अदेल इतका भयंकर आहे की एफबीआयने त्याला मोस्ट वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट केले आहे आणि त्याच्यावर 10 मिलियनचे इनाम देखील आहे. आता तो अल कायदाचा पुढचा उत्तराधिकारी मानला जात आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात तो मक्ताब अल-खिदमत या दहशतवादी गटात सामील झाला.
वयाच्या 30 व्या वर्षी पसरली होती दहशत
जेव्हा अल-अदेल 30 वर्षांचा होता, तेव्हा त्याने मोगादिशू, सोमालिया येथे 1993 चे कुप्रसिद्ध ‘ब्लॅक हॉक डाउन’ ऑपरेशन केले. या कारवाईत 19 अमेरिकन सैनिक मारले गेले. यानंतर जवानांचे मृतदेह रस्त्यावर ओढण्यात आले. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येपासून, अल-अदेल अल-कायदामधील एक प्रमुख रणनीतिकार बनला आहे.