इन्फिनिक्सचा हॉट १२ प्रो आज होतोय सादर

इनफिनिक्स २ ऑगस्ट म्हणजे आज त्यांचा नवा स्मार्टफोन हॉट १२ प्रो सादर करत आहे. त्याची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर लाइव झाली आहे. यामधून फोनची खास फीचर्स आणि स्पेसिफिकशन समोर आली आहेत. या फोनची किंमत जाहीर केली गेलेली नाही मात्र हा मिडरेंज बजेट फोन असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

हॉट १२ प्रो साठी ६.६ इंची एचडी डिस्प्ले आणि ५ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली आहे आणि फोनला १३ जीबी रॅम आहे. म्हणजे ८ जीबीची रॅम आणि पाच जीबी व्हर्च्युअल रॅम असे हे फिचर आहे. इंटरनल स्टोरेज १२८ जीबी आहे. रिअरला एलईडी फ्लॅश सह दोन कॅमेरे दिले गेले आहेत. त्यातील प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा आहे. याच बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर असून बॅटरीला १८ वॉट चार्जिंग सपोर्ट आहे.

कंपनीने हॉट फोन सिरीजमधील हॉट १२ प्ले स्मार्टफोन मे महिन्यात सादर केला होता. त्या फोन साठी ६.८२ इंची फुल एचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम , ३ जीबी व्हर्चुअल रॅम दिली गेली आहे. क्वाड कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिला गेला असून १३ एमपीचा ड्युअल कॅमेरा आणि ६ हजार एमएएचची बॅटरी आहे.