GST: जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1,48,995 कोटी रुपये, गेल्या वर्षीच्या तुलनेत 28% वाढ


नवी दिल्ली – जुलै महिन्यात 1,48,995 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या याच महिन्यात जीएसटी संकलनाच्या रकमेपेक्षा 28 टक्के अधिक आहे. सप्टेंबर 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे दुसरे सर्वात मोठे संकलन आहे.

जीएसटी संकलनाच्या या रकमेपैकी 25751 कोटी रुपये CGST, 32807 कोटी रुपये STST आणि 79,518 कोटी रुपये IGST म्हणून वसूल करण्यात आले आहेत.

जीएसटी संकलनाबाबत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आयात केलेल्या वस्तूंवर कर म्हणून 41420 कोटी रुपये जमा झाले. याशिवाय 10920 कोटी रुपये उपकर म्हणून वसूल करण्यात आले आहेत.

या आकडेवारीनुसार देशात आयात होणाऱ्या मालावर 995 कोटी रुपयांचा उपकर लावण्यात आला आहे. जीएसटी वसुलीची ही आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे.

यापूर्वी जून महिन्यात जीएसटी संकलन 1.44 लाख कोटी रुपये होते. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की सलग पाच महिन्यांत एकूण जीएसटी संकलनाची रक्कम 1.4 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दर महिन्याला जीएसटीच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे.