संजय राउत यांच्या विरोधात एफआयआर दाखल, अडचण वाढली 

मनी लाँडरिंग प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत अडचणीत आले असून या प्रकरणातील एक साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी राउत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविल्यावर संजय राउत यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात एफआरआर दाखल झाला आहे. पाटकर यांच्या मागणी प्रमाणे त्यांना संरक्षण पुरविले गेल्याचे समजते. राऊत यांच्या घरी ईडीने रविवारी सकाळपासून छापे घालून काही कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त केल्यावर रात्री उशिरा संजय राउत यांना अटक केली गेली आहे. आज सकाळी ११.३० मिनिटांनी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राऊत यांच्यावर महिलेचा अपमान प्रकारात एफआयआर दाखल झाला आहे. स्वप्ना पाटकर यांनी १५ जुलै रोजी वर्तमानपत्रातून एक चिठ्ठी त्यांना आली आणि त्यात इडी समोर तोंड उघडले तर बलात्कार करून ठार केले जाईल आणि प्रेत ठाण्याच्या खाडीत फेकले जाईल अशी धमकी दिली गेल्याचे पोलिसांना सांगितले आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हणणे मांडले. या संदर्भात एक ऑडीओ क्लिप सुद्धा नुकतीच व्हायरल झाली होती आणि त्यात एक पुरुष एका महिलेले अश्लील शिव्या आणि धमक्या देत असल्याचे रेकॉर्ड झाले होते.

रविवारी स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांसमोर जबाब नोंदवून संजय राउत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान ५०४, ५०६ आणि ५०९ प्रमाणे संजय राउत यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला गेला आहे. पत्रा चाळ भूमी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्या घरावर ईडीने रविवारी छापा मारून सुमारे ११.५० लाख रोख आणि काही कागदपत्रे जप्त केल्याचे समजते.