डेंगीवर पपईची पाने गुणकारी


डेंगी हा आजार साधारणत: हिवतापासारखा असतो पण अन्य तत्सम आजार आणि डेंगी यांच्यात फरक आहे. तसे हे सारेच आजार डासांमुळे होतात. अंग दुखणे, थंडीताप असेे त्रास या सगळ्याच आजारात होतात पण डेंगीत रक्तातल्या प्लेटलेटस कमी होतात. या आजारांवर औषध नाही. लक्षणावर उपचार केले जातात. मात्र डेंगीवर पपयीच्या पानाचे औषध गुणकारी ठरले असून त्या औषधाने रक्तातल्या प्लेटलेटस्ची संख्या वाढते असे दिसून आले आहे. हा उपचार ४०० रुग्णांवर करण्यात आला. त्यातल्या २०० जणांवर केवळ प्रचलित उपचार करण्यात आले. पण प्रयोगाखाली असलेल्या २०० जणांना प्रचलित उपचार आणि पपयीच्या पानाचे औषध दिले. त्यांना लवकर गुण आला आणि त्यांच्या प्लेटलेटस् लवकर वाढल्याचे दिसून आले.

पपयीच्या पानात फिनोलिक द्रव्ये असतात त्याशिवाय पॅपेन हे द्रव्य असते. त्यांच्यामुळे रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पपयीच्या पानांमुळे केवळ डेंगीच नाही तर मलेरियाही दुरूस्त होण्यास मदत होते. त्यासाठी या पानातले ऍसिटोजेनीन हे द्रव्य उपयुक्त ठरते. अशा आजारांवर पपयीच्या पानांचा उपचार करताना तो तीन प्रकारांनी करता येतो. पहिल्या प्रकारात पपयीची पाने घेतली जातात. ती स्वच्छ धुतली जातात आणि अर्धवट वाळवली जातात. नंतर ही चार ते पाच पाने लहान लहान तुकडे करून एका भांड्यात ठेवून त्यावर दोन लीटर पाणी टाकले जाते. पाने आणि पाणि यांचे हे मिश्रण गरम केले जाते. पाणी निम्मे आटेपर्यंत ते उकळले जाते. यातून तयार झालेला हा काढा नंतर दिवसातून दोन वेळा रुग्णाला दिला जातो.

पाने चिरडून त्यांचा अर्क काढला जातो आणि तो अर्क एका ग्लासात ठेवून तो अर्क दिवसातून दोन वेळा दोन दोन चमचे असा दिला जातो. हा रस किंवा अर्क हा कडू असतो पण तो फार गुणकारी ठरलेला आहे. हे झाले पानाचे उपचार पण पपयीची फोड खाल्ल्यानेही प्लेटलेटस् वाढतात असेही दिसून आले आहे. मात्र पपयीचा रस काढून त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळावा आणि हा रस दिवसातून दोन तीन वेळा थोडा थोडा प्राशन करावा. असा आहे हा घरगुती उपचार. डेंगीच्या रुग्णांनी हे उपचार करण्यास काहीच हरकत नाही. डॉक्टरांचे इलाज सुरूच ठेवावेत आणि हाही उपाय जारी ठेवावा. त्यातून झाला तर लाभच आहे. नुकसान काहीच नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment