“या आयुष्यावर आपला कंट्रोल नाही. आयुष्यातील पुढील मिनिट आपल्याला घडतो अथवा खाली पाडतो. तुमचा उद्याचा दिवस असा दिवस असेल, जो तुमचे आयुष्यच बदलून टाकेल. मात्र या घटनांना नकारात्मक दृष्टीने घेण्याऐवजी समजण्याचा प्रयत्न करा की, हे दुसरे काहीही नसून, आयुष्य तुम्हाला विजेता बनण्याची आणखी एक संधी देत आहे.”, हे म्हणणे आहे किरण कनौजियाचे. किरण कनौजिया देशातील पहिली महिला ब्लेड रनर आहे.
ही आहे देशातील पहिली महिला ब्लेड रनर, पाय गमावल्यानंतरही खचली नाही
“My parents used to iron clothes for a living, and earned 2,000 Rupees a month. We were 3 siblings and life was…
Posted by Humans of Bombay on Saturday, October 26, 2019
फेसबुकवरी लोकप्रिय पेज ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या जीवनातील अनुभव शेअर केले. ती सांगते की, घर चालवण्यासाठी आई-वडील कपडे इस्त्री करण्याचे काम करायचे. ते महिन्याला 2 हजार रुपये कमवायचे. अशावेळी छोट्या-छोट्या गरजा पुर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. वीजेचे बिल भरण्यासाठी पैसे नसायचे, अशावेळी आम्ही तिन्ही भाऊ-बहिण रस्त्यावरील लाईटीच्या खांबा खाली जाऊन अभ्यास करत बसायचो.
ती सांगते की, 12 वी पर्यंत खूप मेहनत घेतली. त्यामुळे चांगल्या युनिवर्सिटीमध्ये अडमिशन मिळाले. पहिल्या वर्षी वर्गात टॉप केल्यावर इतर विषयांसाठी मला स्कॉलरशीप मिळाली. एवढेच नाही तर शिक्षणानंतर माझ्या ड्रीम कंपनीत नोकरी देखील मिळाली. सर्वकाही चांगले होत होते. घराची परिस्थिती सुधरत होती. मात्र कदाचित आयुष्याला काहीतरी वेगळे हवे होते.
किरणचा 25 वा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणेच ती रात्री रेल्वेने ऑफिसवरून घरी परतत होती. ती दरवाजाजवळ उभी असतानाच दोन व्यक्ती आले आणि तिची बॅग ओढू लागले. काही सेंकदातच त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली व तिली देखील खाली ओढले. ते पळून गेले. मात्र किरणचा पाय ट्रॅक्समध्ये अडकला. अडकलेल्या पायावरून रेल्वेचे चार कोच गेले. लोक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी सांगितले की, तिचे पाय ठीक होऊ शकत नाही. पाय कापावा लागेल.
एक महिने बेडवर राहिल्यानंतर प्रोस्थेटिक लेग (कृत्रिम पाय) लावण्यात आला. मात्र रूटीन चेकअप वेळी जेव्हा पायामध्ये वेदना होत असल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी बेजबाबदारपणे सांगितले की, तिच्या पायात टाके तसेच राहिले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, तू चालू शकशील. या टाक्यांमुळे काहीही नुकसान होणार नाही. केवळ पळता येणार नाही. त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
यानंतर किरणने पुन्हा नोकरी सुरू केली व सामान्यपणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र तिला आयुष्यात खूप काही करायचे होते. ती रिहॅब सेंटरमध्ये गेली. जे पॅरा-एथलीट्सला ट्रेनिंग देतात. तिने ठरवले की, तिला केवळ चालायचे नाही तर आता धावायचे आहे. तिला सगळ्यांना चुकीचे ठरवायचे होते.
यानंतर किरणने ट्रेनिंग घेण्यास सुरूवात केली. काही महिन्यातच ती पळायला लागली. एका मॅरोथॉनमध्ये भाग घेत ती 21 किमी धावली. आपल्या शरीरातील एक महत्त्वपुर्ण अवयव गमवल्यानंतर देखील तिने जगणे सोडले नाही. लढणे सोडले नाही. आता ती मॅरोथॉनमध्ये भाग घेते. ती देशातील पहिली महिला ब्लेड रनर आहे.