या हॉटेलने 8 जणांच्या जेवणाचे आकारले तब्बल 44 लाख रुपये

सोशल मीडिया सध्या वारंवार कोणत्यातरी हॉटेलचे बिल चर्चेत असते. कधी दोन केळ्यांसाठी हजारो रुपये तर उकडलेल्या अंड्यांसाठी अतिरिक्त पैसे घेतल्याचे समोर येते. काहीसा असाच एक प्रकार चीनच्या शंघाई येथे समोर आला आहे. येथील हॉटेलने 8 लोकांना डिनरसाठी 418,245 युआन म्हणजेच 44 लाख 26 हजार रुपये बिल आकारले आहे. या बिलामुळे हे हॉटेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बिलामधील खास गोष्ट म्हणजे यात केवळ 20 फूड मेन्यूचा उल्लेख आहे. केवळ 20 पदार्थांसाठी 44 लाख रुपये आकारण्यात आले. शंघाईच्या मॅगी रेस्त्रांमध्ये दुबईवरून आलेले 8 जण डिनरसाठी आले होते.

सुरूवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हे बिल खोटे असून, फोटोशॉप करण्यात आल्याचे सांगितले. मात्र या हॉटेलचे मालक आणि चीफ शेफ झाओगुओ यांनी मान्य केले की, हे बिल खरे आहे व त्यांनी अती महागडे जेवण सर्व्ह केले.

मॅगी रेस्त्रांचे चीफ शेफ सन झाओगुओ यांच्यानुसार, हा डिनर दुबईवरून आलेल्या एका ग्राहक आणि त्यांच्या मित्रांसाठी तयार करण्यात आला होता. हे जेवण बनविण्यासाठी 200 वर्ष जुन्या सॉल्ट प्लेटचा वापर करण्यात आला आहे.

चीनच्या बाजार नियमांनुसार, हे महागड्या डिनर नियमांचे उल्लंघन आहे. तपास अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये जाऊन चौकशी देखील केली. अद्याप चौकशीचा रिपोर्ट समोर आलेला नाही.

Leave a Comment