गिनीज बुकात 99 मीटर उंच 24 मजली लाकडी इमारतीची नोंद

चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरता बनलेल्या 99.9 मीटर उंच लाकडाच्या इमारतीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जागा मिळाली आहे. जगातील पहिली लाकडाची इमारत, सर्वात उंच इमारत आणि आर्किटेक्चर अशा तीन विभागात विश्व विक्रमात समावेश करण्यात आले आहे.

ही 24 मजली लाकडी इमारत आहे. यामध्ये 150 पेक्षा अधिक खोल्या आहेत. या बिल्डिंगला तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला असून, आर्किटेक्ट सुइ हँगच्या डिझाईनच्या आधारवार बनवण्यात आले आहे.

इमारत बनवण्यासाठी देवधराच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. याचे छत व भिंती देखील लाकडाची आहे. ही इमारत पुर्णपणे इको फ्रेंडली आहे.

 

Leave a Comment