सौंदर्य उपचार : त्वचेची निगा

skin2

निस्तेज, पिंपलयुक्त त्वचा सौंदर्यात बाधा आणते. चेहेऱ्याची त्वचा मऊ, चमकदार, सतेज ठेवण्यासाठी दैनंदिन कार्यक्रमात क्लिन्जींग, टोनींग, मॉईश्चरायजिंग, व एक्सफोलीएशन यांचा समावेश जरूर करावा. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

    *       क्लिन्जींग : हा त्वचेच्या निगराणीतला  पहिला टप्पा असुन यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. यासाठी तेलकट, कोरडी किंवा संमिश्र अशा त्वचेच्या प्रकारानुसार क्लिन्जरची निवड करावी. बार सोपमुळे त्वचा अगदीच कोरडी होत असल्याने त्याचा वापर टाळलेलाच बरा. चेहेऱ्यासाठी नेहेमी क्रिमी क्लिन्जर वापरावा.
    *       टोनींग : क्लिन्जरने चेहेऱ्याची त्वचा स्वच्छ केल्यावर टोनरचा वापर करावा. यामुळे त्वचेत राहिलेले तेलाचे किंवा मेकअपचे अंश निघुन जाण्यास मदत होते.
    *       मॉईश्चरायजिंग : टोनरचा उपयोग केल्यानंतर उघडी झालेली त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी मॉईश्चरायजरचा वापर करावा. यामुळे तेथे जंतुसंसर्ग होणार नाही. शिवाय घराबाहेर पडण्यापूर्वी हानिकारक किरणांपासुन बचाव करण्यासाठी चेहेऱ्याला, मानेला सनस्क्रीन लोशन जरूर लावावे.
    *       एक्सफोलीएशन : चेहेऱ्यावर साठत असलेल्या मृत पेशींच्या थरामुळे त्वचेला एक प्रकारचा निस्तेजपणा येतो. हा थर हटविण्याचे काम एक्सफोलीएशनमुळे केले जाते. यासाठी सौम्य स्क्रबरचा किंवा पीलचा वापर करावा. घरगुती फेसपैकही यासाठी उपयोगी पडतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment