त्वचेची निगा : नैसर्गिक उपाय

skin

त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नेहेमी महागड्या, बाजारू प्रसाधनांचीच गरज असते असे नाही. आपल्या स्वयंपाकघरात, विशेषतः फ्रीजमध्ये नजर टाकल्यास त्वचेचा पोत सुधारणारे, तिचे पोषण करणारे अनेक पदार्थ सापडतात. त्वचेला नैसर्गिक आरोग्य मिळवुन देणारे काही पदार्थ आपण पाहु :

    *       टोमैटो : लहानसहान त्वचादोष नाहीसे करून तिचा रंग उजळण्यास टोमैटो मदत करतो. यासाठी टोमैटोचा गर चेहेऱ्याला व मानेला रोज लावुन तासाभराने कोमट पाण्याने धुऊन घ्यावा.
    *       दही : हे एक नैसर्गिक क्लिन्जर व मॉईश्चरायजर आहे. यामुळे त्वचा टवटवीत, मुलायम होते. रोज दहा मिनिटे चेहेऱ्याला दही लावावे व दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाकावे.
    *       लिंबु : यामुळे काळे डाग व  एक्ने नाहीसे होऊन त्वचेची चमक वाढते. कॉटनबॉल वापरून चेहेऱ्याला लिंबाचा रस लावावा व अर्ध्या तासाने धुऊन घ्यावे. ऑलिव्ह तेल, गुलाबपाणी, काकडीचा रस यात मिसळुन लिंबाचा रस लावणे अधिक फायदेशीर ठरेल.
    *         काकडी : काकडी चेहेऱ्यावरील मुरुमांचे डाग नाहीसे करते. मुरुमांमुळे तयार झालेले व्रणही यामुळे भरून निघतात. १०-१५ मिनिटे चेहेऱ्याला काकडीचा रस लावुन ठेवावा व १५ मिनिटांनी धुऊन टाकावे. डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवल्यास डोळ्यांचा थकवा नाहीसा होऊन काळी वर्तुळेही कमी होण्यास मदत होते.
    *       मध : यामुळे त्वचा स्वच्छ होऊन अधिक सतेज बनते. १५ मिनिटे रोज चेहेऱ्याला मध लावावे व थंड पाण्याने धुऊन टाकावे.
    *       नैसर्गिक फेस मास्क : दही, बदाम पेस्ट, ऑलिव्ह तेल, कोरफड गर, संत्रासाल पावडर, लिंबु रस, पुदीना रस, हळद, बेसन, दुध या पदार्थांचा वापर करून त्याचा मास्क चेहेऱ्याला लावावा. वाळल्यावर थंड पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढते व ती टवटवीत, कोमल बनते.

याशिवाय अनेक नैसर्गिक पदार्थ त्वचेचे आरोग्य वाढवतात. त्यापैकी काही पदार्थ असे आहेत :

    *       आवश्यक तेले : एरंडेल, तीळ, ऑलिव्ह, लव्हेंडर अशी तेले त्वचेसाठी फारच फायदेशीर ठरतात. यामुळे चेहेऱ्यावरील मुरुमे, काळे डाग, एक्ने नाहीसे होऊन चेहेऱ्याला नविन झळाळी मिळते. त्वचा मऊ, मुलायम, चमकदार बनते.
    *         फळे : फळांचे गर चेहेऱ्यावर लावल्याने त्वचेचा काळसरपणा कमी होऊन त्वचेवरील मृतपेशी दूर केल्या जातात. पपई व लिंबू वयानुसार चेहेऱ्यावर उमटणाऱ्या खुणा कमी करतात. बटाटा व टोमैटो सूर्याच्या उष्णतेमुळे आलेला काळसरपणा, काळे डाग हटवितात.

घरगुती फेसपैकमध्ये व स्क्रबमध्ये रसायने अजिबात नसल्याने ते त्वचेसाठी सुरक्षित असुन अतिशय परिणामकारकही आहेत. मध, अंडी, हळद, दुध, मसुर पीठ, बेसन यांच्या मिश्रणातुन आपण असे फेसपैक व स्क्रब घरच्याघरी तयार करू शकतो.
कोरफड, बदामतेल, तिळतेल, दही, मध, चंदन पावडर या सगळ्या नैसर्गिक पदार्थांमुळे त्वचा अगदी सुंदर बनते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन वापराने त्वचेच्या सौंदर्यात वाढ होते.
नियमित व्यायाम, पोषक आहार आणि योग्य निगा यामुळे त्वचेबरोबरच संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य टिकुन राहण्यास मदत होते. निकोप त्वचा हा निकोप आरोग्याचा आरसा आहे असे म्हणतात. त्यांचा लाभ झाल्यास आपल्या आत्मविश्वासात नक्कीच मोलाची भर पडते.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

4 thoughts on “त्वचेची निगा : नैसर्गिक उपाय”

  1. khup changali mahiti sangitali ahe

    hyacha sarvana fayadach hoel.

    khup khup abhar

Leave a Comment