गरोदर असतांना कोणती काळजी घ्यावी ?

विवाह कधी करावा, त्यासाठी योग्य वय कोणतं असे अनेक प्रश्न नेहमीच उपस्थित होताना आपण पाहतो. त्यातही मुलींच्या बाबतीत बोलायचे तर कोणत्याही परिस्थितीत वीस वर्षाच्या आंत मुलीचे लग्न करू नये हे सर्वात योग्य. कारण लग्न करून आपलं परिचित घर, माणसं सोडून मुली संपूर्णपणे अपरिचित वातावरणात जात असतात. त्यामुळे विवाहासाठी मुलीची मानसिक तयारी होऊ देण फार महत्त्वाचे आहे.

लग्न झाले की पुढचा मोठा प्रश्न येतो तो अपत्य जन्माचा. पती पत्नीत विश्वासाचे नाते तयार होईपर्यंत मूल होऊ देण्याचा निर्णय लांबविला जावा हे सर्वार्थाने येाग्य ठरते असे मत आयुर्वेदाचार्य श्रीकांत बागेवाडीकर व्यत्त* करतात.

गरोदरपणाचा काळ अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण असतो.एकदा अपत्य होऊ देण्याचा निर्णय घेतला की गरोदरपणाच्या काळात आईचं मन कुठल्याही परिस्थितीत आनंदी कसे राहील हे पाहणं आवश्यक आहे. कारण या काळात मनावर ताण असेल अथवा अकस्मात एखादा जबरदस्त मानसिक धक्का बसला तर जन्मणार्‍या मुलांत विकृती येते असे आढळले आहे.

गरोदरपणाच्या पहिल्या दोन तीन महिन्यात बर्‍याचजणांनी मळमळणे, अन्नाची वासना जाणे, उलटी होणे असे त्रास सकाळच्या वेळात होतात. यालाच मॉर्निंग सिकनेस किवा डोहाळे लागणे असे म्हणतात. मात्र हा त्रास आपोआपच कमी होत असल्याने या काळात औषधे देऊ नयेत. जे खावेसे वाटेल ते जरूर खायला द्यावे. मात्र पावभाजी, पिझ्झा, बाहेरचे मसालेदार पदार्थ असे डोहाळे असतील तर ते बेतानेच पुरवावेत असेही वैद्य सांगतात.

या काळात मैदा, मैद्याचे पदार्थ टाळणे इष्ट आहेच पण दुसर्‍या महिन्यापासून दररोज पायी चालण्याचा व्यायाम आवश्यक आहे. नेहमीचे सर्व जेवण, फळे, दूध घ्यावे. पण ज्यांना दूध आवडत नसेल आणि जेवण व्यवस्थित जात असेल तर दूध पिण्याचा अट्टाहास करू नये. उलट्यांचे प्रमाण अधिक असेल तर मात्र दुधाला पर्याय नाही. गरोदरपणाच्या काळात लोह जादा प्रमाणात शरीराला आवश्यक असते, तेव्हा लोहाच्या गोळ्यांऐवजी आहारातूनच लोहाचा पुरवठा होईल याची काळजी घेता येते.

त्यासाठी अळीव, डिक, सर्व पालेभाज्या, गडद रंगाची फळे, बीट, उसळी, सुके अथवा ताजे अंजीर खाता येतील. आहारातील लोह रत्त*ात शोषण्यासाठी सी जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्यासाठी लिबू सरबत जरूर पिता येईल. डाळिबाचा रसही हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यास अतिशय उपयुत्त* ठरतो. डाळिबाचेदाणे स्वच्छ धुतलेल्या रूमालात घालून रूमाल पिळावा. रस निघतो. त्यात किचित साखर, मीठ घालून हा पेलाभर रस थोडा थोडा असा दिवसभर घ्यावा. केळी, पपई ही फळेही प्रमाणात खायला हरकत नाही.
 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

2 thoughts on “गरोदर असतांना कोणती काळजी घ्यावी ?”

  1. नीलिमा जोशी

    खूप उपयुक्त माहिती आहे…मराठी बातम्यांची चांगली वेबसाइट आहे

Leave a Comment