Origin of Covid-19 : वुहान सीफूड मार्केटमधून पसरला कोरोना, ‘सायन्स’मध्ये प्रकाशित अभ्यासाचा दावा


वॉशिंग्टन – कोरोना महामारी अजूनही जगभरात मोठ्या संकटाचे कारण बनलेली आहे. याचा प्रसार कसा आणि कुठून झाला, असा प्रश्न आजही पुन्हा पुन्हा पडतो. याचे अंतिम उत्तर अद्याप मिळालेले नाही. आता एका नव्या संशोधनात पुराव्याच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, चीनच्या वुहानमध्ये असलेल्या सीफूड आणि वन्यजीव बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला. आतापर्यंत जगभरात 64 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दोन नवीन अभ्यासांमध्ये वुहानमधील हुआनान मरीन अँड वाइल्डलाइफ मार्केटमधून कोरोना पसरल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.