Monsoon Offer : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! घर आणि कार कर्ज घेणे झाले स्वस्त, बँकेने सुरू केली मान्सून ऑफर


मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मान्सून ऑफर सुरू केली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना स्वस्त कार लोन आणि होम लोनचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन कार किंवा गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. बँकेने 29 जुलै 2022 रोजी ही ऑफर सुरू केली आहे.

1 ऑगस्टपासून मिळणार आहे या ऑफरचा लाभ
या ऑफरद्वारे, ग्राहकांना यापुढे गृह कर्ज आणि कार कर्ज घेण्यासाठी कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे ग्राहकांना बँकेकडून कर्ज घेणे स्वस्त होणार आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून बँक ही विशेष ऑफर सुरू करणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र रिटेल बोनान्झा मान्सून धमाका ऑफर, असे या ऑफरचे नाव आहे. कार कर्जासाठी बँक 7.70 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, गृहकर्जावर 7.30 टक्के व्याजदर दिला जात आहे.

इतर अनेक सुविधांचा ग्राहकांना मिळणार आहे लाभ
यासोबतच मान्सून ऑफरमध्ये ग्राहकांना प्रोसेसिंग फीमध्ये सूट व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये सूट मिळेल. गृहकर्ज आणि कार कर्जामध्ये ग्राहकांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. यासोबतच, ग्राहकांना पार्ट टाइम चार्जेस, प्री क्लोजर चार्जेस आणि प्री पेमेंट चार्जेस इत्यादी इतर अनेक शुल्क भरावे लागणार नाहीत.

गोल्ड लोनवरही मिळतील विशेष फायदे
यासोबतच या बँक ऑफ महाराष्ट्रच्या लिखित बोनान्झा-मान्सून धमाका ऑफरमध्ये (BOM मान्सून ऑफर) गोल्ड लोनवरही विशेष सवलत दिली जात आहे. यामध्ये ग्राहकांना 7.70 टक्के व्याजदराने 25 लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज मिळू शकते. जर एखाद्या ग्राहकाने 3 लाख रुपयांपर्यंत सोन्याचे कर्ज घेतले, तर अशा परिस्थितीत ग्राहकाला प्रक्रिया शुल्क म्हणून एक रुपयाही भरावा लागणार नाही. यासोबतच या कर्जाचे पैसे अवघ्या 15 मिनिटांत ग्राहकांच्या खात्यात जमा होतील.