लोम्बार्गिनी उरुस- भारतीय बाजारात २०० एसयूव्ही विकून केले रेकॉर्ड

लग्झरी एसयूव्ही सेग्मेंट मधील सर्वात लोकप्रिय लोम्बार्गिनी उरूसने भारतीय बाजारात धमाल केली असून २०० कार्स विकून रेकॉर्ड नोंदविले आहे. ३.१५ कोटी रुपये किमतीच्या या कार्स भारतीय बाजारात २०१८ मध्ये दाखल झाल्या होत्या. सर्वात जलद, लग्झरी एसयुव्हीची २०० युनिट विकले जाण्याचे हे रेकॉर्ड आहे. रॅपर बादशहाने दुसरी काळ्या रंगाची लोम्बार्गिनी कार खरेदी केल्याची बातमी नुकतीच आली आहे.

भारतीय बाजारात विकल्या गेलेल्या २०० युनिट पैकी ८० टक्क्यापेक्षा जास्त कार्स फर्स्ट टाईम बायर्स म्हंजे प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांनी घेतल्या आहेत. वास्तविक भारतात सेलेब्रिटी आणि राजकारणी यांची पहिली पसंती रेंज रोव्हरला आहे तरीही उरूसने या सेग्मेंट मध्ये धमाल विक्रीचे टार्गेट गाठले आहे. लोम्बार्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी सांगितले, लोम्बार्गिनी उरूस भारतीय बाजारात सादर होताच तिने मार्केटवर कब्जा केला आहे.

अग्रवाल म्हणाले, गेल्या वर्षात १०० युनिट विकली गेली आणि लोम्बार्गिनी उरूस पर्ल कॅप्सूल आणि ग्राफाईट कॅप्सूल ही मॉडेल दाखल झाल्यावर आणखी वेगाने विक्री वाढली. लोम्बार्गिनीने देशात दोन व्हेरीयंट सादर केली आहेत. पैकी उरूस ८ व्ही इंजिनचे मॉडेल ३ कोटी १५ लाख तर पर्ल कॅप्सूलचे मॉडेल ३ कोटी ४३ लाखाला आहे. या सुपरस्पोर्टस लग्झरी एसयूव्हीला ४.० लिटर व्ही एट ट्वीन टर्बो इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही कार ३.६ सेकंदात घेते आणि तिचा सर्वोत्तम वेग आहे ताशी ३०५ किमी. जगभरात कंपनीने २० हजाराहून जास्त युनिट विकली आहेत.