तुम्हाला माहिती आहे का? एटीएम कार्ड वर मिळते पाच लाखाचे विमा संरक्षण

आजकाल सर्वसामान्य नागरिक रोजच्या जीवनात बँकांच्या एटीएम कार्डचा वापर नित्यनेमाने करत असतात. देशाच्या कुठल्याही भागातून कधीही पैसे काढणे किंवा शॉपिंग करताना हे कार्ड नुसते स्वाईप करून पैसे देणे अशी मोठी सुविधा युजर्सना मिळत असते. पण एटीएम कार्ड होल्डरचा मृत्यू किंवा अपघात झाला तर हेच कार्ड यांच्या साठी सहारा बनू शकते याची माहिती मात्र अनेकांना नाही. खासगी असो वा सरकारी, कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड सोबतच कार्ड धारकाला मोफत अपघात विमा मिळत असतो. त्यातून २५ हजारांपासून ५ लाख रुपयांपर्यंत विमा कव्हर मिळते.

तुमचे कार्ड कोणत्या श्रेणीचे आहे त्यावर विमा भरपाईची रक्कम ठरत असते. क्लासिक कार्ड साठी १ लाख रुपये, प्लॅटीनम साठी दोन लाख रुपये, सामान्य मास्टर कार्ड साठी ५० हजार रुपये, प्लॅटीनम मास्टर कार्डसाठी ५ लाख रुपये, व्हीसा कार्ड साठी  दीड ते दोन लाख रुपये विमा संरक्षण असते. इतकेच नव्हे तर जनधन खात्याच्या रूपे कार्डवर सुद्धा ग्राहकाला १ ते २ लाख रुपये रकमेचे विमा संरक्षण मिळते.

ग्राहकाने एटीएमचा उपयोग केल्यावर ४५ दिवसांच्या आत मृत्यू किंवा अपघात झाला तर विमा भरपाई मिळते. ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाला तर कार्डच्या नॉमिनीने संबंधित शाखेत जाऊन भरपाई अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केल्यावर नॉमिनी विमा क्लेम करू शकतो.