आला दुनियेतील पहिला २०० एमपी कॅमेरावाला मोटो एक्स ३० प्रो
मोटोरोलाने दुनियेतील पहिला २०० एमपी कॅमेरा असलेला मोटो एक्स ३० प्रो लाँच करण्याची सर्व तयारी पूर्ण केली असून २ ऑगस्टला हा फोन सादर केला जात आहे. या फोनची जोरदार चर्चा होत आहे. कंपनीने एक टीझर मधून फोनचा लुक विबोवर शेअर केला आहे. टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी ट्वीटरवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यात ब्लॅक कलर व्हेरीयंट दिसते आहे.
या फोनच्या रिअर साईड वर त्रिकोणी आकारता तीन कॅमेरे आणि बॅक पॅनलवर लोगो आहे. फ्रंट सेंटर पंचहोल डिस्प्ले असून फोनची किंमत आहे ८९९ युरो म्हणजे ७२६०० रुपये. फोन साठी ६.७३ इंची फुल एचडी अमोलेड डिस्प्ले, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिपसेट, रिअरला एलईडी फ्लॅश सह ट्रिपल कॅमेरा सेट आहे. त्यात २०० एमपीचा मेन, ५० एमपीचा आणि १२ एमपीचा असे आणखी दोन कॅमेरे आहेत. सेल्फी साठी ६० एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. ४५०० एमएएच ची बॅटरी १२५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सह असून अँड्राईड १२ ओएस आहे.