अजिंक्य रहाणेच्या फॅमिली फोटोला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद
टीम इंडियामधील गुणी खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या टीम बाहेर आहे आणि कुटुंबांसमवेत वेळ घालवितो आहे. त्याने सोशल मिडीयावर काही फोटो अगदी परिपूर्ण कॅप्शन सह शेअर केले असून त्यांच्या चाहत्यांनी या फोटोंना मोठा प्रतिसाद दिला आहे. अजिंक्यने शेअर केलेल्या फोटोवरून तो सध्या मुंबईत असल्याचे लक्षात येत आहे.
एका फोटो मध्ये अजिंक्यची पत्नी राधिका आणि मुलगी आर्या दिसते आहे. त्या खालच्या कॅप्शन मध्ये अजिंक्यने ‘माझे पूर्ण जग एका फोटोत’ असे म्हटले आहे. अजिंक्यची पत्नी राधिका प्रेग्नंट आहे. अजिंक्यने पत्नीच्या प्रेग्नन्सीची बातमी इन्स्टाग्रामवर देताना शेअर केलेल्या फोटोत. ऑक्टोबर २०२२, आर्या जन्म ऑक्टोबर २०१९’ असे म्हटले होते. या फोटोना १४ हजार लाईक्स मिळाले असून २५० युजर्सनी ते रीट्वीट केले आहेत.
अजिंक्य जेव्हा मैदानावर नसतो तेव्हा तो सर्व वेळ कुटुंबाला देतो. आयपीएलच्या मागच्या सिझन मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. ३४ वर्षीय राहणे याने शेवटची कसोटी जानेवारीत द. आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्याने ८२ कसोटी मध्ये १२ शतके, २५ अर्थशतके, ४९३१ धावा केल्या आहेत. ९० वन डे मध्ये २९६२ धावा केल्या आहेत तर २० आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये ३७५ धावा केल्या आहेत. वन डे मध्ये त्याने ३ शतके आणि २४ अर्धशतके काढलेली आहेत.