SL vs PAK : श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा केला 246 धावांनी पराभव, मालिका एक-एक अशी बरोबरीत


कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 246 धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या या मोठ्या विजयासह मालिका एक-एक अशी बरोबरीत सुटली. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत मोठी नोंद केली. संघाने पहिल्या डावात सर्वबाद 378 धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव 360 धावांवर घोषित करण्यात आला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 231 धावा आणि दुसऱ्या डावात 261 धावा करत सर्वबाद झाला. याआधी पाकिस्तानने पहिला सामना 4 विकेटने जिंकला होता.

दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानचा संघ 261 धावा करून सर्वबाद झाला. बाबर आझमने संघाकडून 81 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 146 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इमाम-उल-हकने 49 धावांची खेळी खेळली. यादरम्यान श्रीलंकेसाठी प्रभात जयसूर्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 32 षटकात 117 धावा देत 5 बळी घेतले. त्याने 5 मेडन षटकेही काढली. तर रमेश मेंडिसने 4 बळी घेतले.

या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर बाबर आझम सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 4 डावात 271 धावा केल्या. तर दिनेश चंडिमलने 4 डावात 271 धावा केल्या. त्यामुळे दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. जर आपण सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोललो तर या बाबतीत प्रभात पहिल्या स्थानावर राहिला. त्याने 17 विकेट घेतल्या.