Mobile Tips : तुम्ही तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात, तर या सोप्या पद्धतीने करता येईल अनलॉक


मोबाईल फोन ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे म्हटले तर कदाचित वावगे ठरणार नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन तुम्हाला सहज दिसेल. शालेय वर्ग मोबाईलवर ऑनलाईन, एकमेकांशी बोलायचे असेल तर मोबाईल हवाच, ऑनलाईन बँकेशी निगडीत काम करायचे असेल तर मोबाईल, खरेदी, वीज बिल भरणे इत्यादी अनेक कामांसाठी मोबाईल फोन उपयुक्त आहे. त्याच वेळी, फोनमध्ये बँकिंग माहितीपासून इतर अनेक गोपनीय माहिती असते, ज्यामुळे लोक त्यामध्ये पॅटर्न किंवा पासवर्डचे लॉक ठेवतात. पण जरा कल्पना करा की हे लॉक जर तुम्ही विसरलात, तर ते कसे उघडेल? तर आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर तुम्ही तो कसा उघडू शकता.

  1. अनेक लोकांसोबत असे घडते की ते त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न विसरतात, त्यामुळे त्यांना मोबाईल वापरता येत नाही. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या बाजूला दिलेल्या बटणाने स्विच ऑफ करा आणि एक मिनिट थांबा.
  2. यानंतर तुम्हाला पॉवर स्विच आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकाच वेळी दाबावे लागेल. असे केल्याने तुमचा मोबाइल ‘रिकव्हरी मोड’मध्ये जाईल.
  3. दोन्ही स्विचेस (व्हॉल्यूम डाउन आणि पॉवर बटणे) जास्त वेळ दाबून ठेवा आणि तुमचा मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये गेल्यावर त्यांना दाबणे थांबवा.
  4. रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर, ‘फॅक्टरी रीसेट’ पर्याय निवडा. आता ‘Wipe Cache’ वर क्लिक करा. असे केल्याने, तुमच्या मोबाइल स्टोरेजमधील सर्व डेटा साफ होईल.
  5. यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होताच, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा केल्यानंतर तुमचा मोबाइल फोन पुन्हा चालू करा आणि तो पासवर्डशिवाय उघडेल.